हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानच्या फोटोवर बॉयफ्रेंडची कमेंट, म्हणाला…

सुझान गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्सलन गोनीला डेट करत आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये गणली जायची. अनेकांना ‘कपल गोल्स’ देणाऱ्या या जोडप्याने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सुझान अभिनेता अर्सलन गोनीला डेट करत आहे. ते सतत सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत. अर्सलनने नुकताच केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.

सुझानने शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मिरर सेल्फी शेअर केला होता. या सेल्फीमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे. सुझानच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. पण सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलनने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने ‘गर्ल’ अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा : मला मुर्ख समजतोस का?; करीना आणि सैफमध्ये झाले भांडण? व्हिडीओ चर्चेत

दरम्यान हृतिक रोशन आणि सुझान खान यांना वेगळं होऊन जवळपास अनेक वर्षे उलटली आहेत. पण आजही ही दोघं अनेक ठिकाणी एकत्र फिरताना, मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात. आजही या दोघांनी त्यांच्यातील मैत्रीच नाते जपले आहे. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघेही मुलांसोबत व्हेकेशन ट्रीपवरही जातात.

हृतिक आणि सुझानचा २०१४ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. सध्या सुझान अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसला होता. यात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arslan goni cute comment on sussanne khan mirror selfie leaves her blushing avb

Next Story
ही गर्लफ्रेंड आहे का? हृतिक मुलीचा हात पकडून हॉटेलमधून बाहेर आल्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी