करोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरूवात झालीय 18 वर्षांवरील अनेक जण लसीकरण करून घेत आहेत. अशात सिनेसृष्टीतील आणि मालिकांमधील अनेक कलाकार लस घेत असून त्यांचे लसीकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे अनेक सेलिब्रिटींना ट्रोल देखील व्हावं लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकिता लोखंडे आणि दिव्या खोसला नंतर आता टीव्ही अभिनेत्री आरती सिंह तिच्या लसीकरणाच्या फोटोमुळे ट्रोल झालीय. आरतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लसी घेतल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती घाबरल्याचं दिसतंय. मात्र यामुळेच आरती ट्रोल झालीय. आरतीने शेअर केलेल्या फोटत तिला इंजेक्शनची भिती वाटत असल्याचं तिने म्हंटलं आहे. “इंजेक्शन्सची भीती वाटते. पण घेणं गरजेचं आहे. आपल्याला याच्याशी लढायचं आहे. लसीचा पहिला डोस घेतला.” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

हे फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी आरतीला ट्रोल केलंय. ” टॅटू काढताना दुखलं नाही तुम्हाला, ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान” तर दुसरा युजर म्हणाला, ” सगळ्यांना पाहून नौटंकी. प्रत्येकवेळी दिखावा करणं थांबव. याआधी जे इंजेक्शन घेतले तेव्हा व्हिडीओ का नाही टाकले?” असं म्हणत नेटकऱ्यांनी आरतीवर निशाणा साधला आहे.

 

वाचा: “इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका”; लसीकरणाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना आशा नेगीने फटकारलं

आणखी एक युजर म्हणाला, “खरचं यार ड्रामेबाज आहे पूर्ण” आरतीच्या आ फोटोवर कमेंट करत अनेकांनी तिला ट्रोल केलंय. नुकतच अभिनेत्री आशा नेगी हिने सोशल मीडियावर लसीकरणाचे फोटो टाकणाऱ्यांवर निशाणा साधला होता. जागरुकतेसाठी ठीक आहे. पण कृपा करून इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका ते खूप त्रासदायक वाटतं” असं म्हणत आशाने व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर निशाणा साधला.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arti singh trolled after she share photo of vaccination on social media people said overacting kpw
First published on: 12-05-2021 at 09:47 IST