सध्या सोशल मीडियावर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा बोलबाला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटासाठी नेटकऱ्यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. कोणी या चित्रपटातील घटनांविषयी त्याना माहित असलेल्या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या आहेत. तर कोणी या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या सगळ्यात एका चाहतीने चक्क तिच्या रक्ताने पोस्टर बनवले आहे. त्याचा फोटो विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हे रक्ताने काढलेलं पोस्टर शेअर करत विवेक म्हणाले, “OMG! अविश्वसनीय. मला काय बोलावे ते कळत नाही…मंजू सोनीजी यांचे आभार कसे मानावे. तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. जर कोणी त्यांना ओळखत असाल, तर कृपया त्यांचा नंबर मला DM मध्ये शेअर करा. #RightToJustice”, असे ट्वीट विवेक अग्नीहोत्री यांनी केले.

आणखी वाचा : शूटिंगदरम्यान सीन कट झाला तरी इम्रान हाश्मीला KISS करत राहिली ‘ही’ अभिनेत्री, Video Viral

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

यानंतर विवेक यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट करत “मी भावनांची कदर करत असलो, तरी लोकांनी असे काही करू नये अशी मी अत्यंत गंभीरपणे विनंती करतो. ही चांगली गोष्ट नाही. चांगले नाही.” मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणाऱ्या आर्टिस्ट मंजू सोनी यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर, आपल्या रक्ताने पोस्टर बनवले आहे. आपल्या रक्ताने त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’च्या पोस्टरमध्ये दिसणार्‍या प्रत्येक कलाकारांच्या चेहऱ्याचे चित्र काढले आहे.

आणखी वाचा : The Kashmir Fliesचा मोठा विक्रम, ठरला करोना काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; तब्बल इतक्या कोटींची कमाई

दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.