शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. त्यानंतर ४ ऑक्टोबरला त्याची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आज आर्यन खानची एनसीबी कोठडी संपत आहे. मात्र, काल रात्री उशिरा एनसीबीनं मुंबईतून एका परदेशी ड्रग पेडलरला अटक केल्यानंतर आर्यन खानची कोठडी वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. दरम्यान शाहरुख खान आणि सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड किडा या इन्स्टाग्राम पेजने सलमान आणि शाहरुखचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सलमान खानच्या एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमाला शाहरुख आणि राणी मुखर्जीने हजेरी लावली होती. तेव्हाचा त्यांचा व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल झाला असून चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखला ‘तुझ्या आयुष्यात असे कोणी आहे का जे तुझ्या सुखात आणि दु:खात नेहमी सहभागी होतात?’ त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत. ‘सलमान जर कधी माझ्यावर संकट आले तर तू आहेस. माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबीयांवर कोणते संकट आले तर तू आहेस’ असे शाहरुख म्हणाला. ते ऐकून सलमान शाहरुखला मिठी मारतो. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : शाहरुखच्या मुलावर कारवाई केल्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “एखादं प्रकरण…”

जेव्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली तेव्हा सलमान खान शाहरुखला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. केवळ सलमानच नाही तर त्याची बहिण आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान देखील शाहरुखच्या घरी गेली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan drugs case old video of shah rukh khan saying salman will help whenever i am in trouble avb
First published on: 07-10-2021 at 12:19 IST