बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के एल राहुल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. ते दोघेही एकमेकांना डेट करत असून नुकतंच त्यांनी त्यांच्य रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केली आहे. ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतंच त्या दोघांचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. यात अथियाने तिच्या बॉयफ्रेंडचे हुडी परिधान केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. यात तिने काळ्या रंगाचा प्रिंट असलेला एक टीशर्ट परिधान केला होता. तर काही दिवसांपूर्वी त्यासारख्याच रंगाचा प्रिंट असलेला एक टीशर्ट के एल राहुलने परिधान केला होता. यामुळे या दोघांच्याही फोटोखाली सेम टीशर्ट अशी कमेंट अनेक नेटकरी करताना दिसत आहे.

इतकच नव्हे तर काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी सेम रंगाची हुडी परिधान केली होती. याचे फोटोही त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो मार्केटिंग बाय राज नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन कोलाज करुन शेअर करण्यात आले आहेत. यात त्या दोघांनाही त्याच रंगाचा हुडी परिधान केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोखाली क्रिकेटपटू मयांक अग्रवाल याने कमेंट करत ‘ही हुडी कुठेतरी बघितल्यासारखी वाटतेय’, असे लिहिले आहे.

दरम्यान हे दोन फोटो बघता अथिया आणि राहुल हे दोघेही एकमेकांचे वॉर्डरोब शेअर करताना दिसत आहेत. तसेच यात त्या दोघांनाही फार आरामदायी वाटत असल्याचेही बोललं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.