रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉयकॉट ट्रेंडमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर फ्लॉपचं सावट होतं, परंतु पहिल्या ३ दिवसांत तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान, रविवारी ब्रह्मास्त्रच्या स्क्रिनिंगमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी चाहत्यांची भेट घेतली. यावेळी रणबीरने चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

Brahmastra Box Office Collection day 3 : ‘ब्रह्मास्त्र’ने जमवला १२५ कोटींचा गल्ला; रणबीर कपूरसाठी ठरला बिग ओपनर

प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम हे ब्रह्मास्त्र टीमसाठी सर्वात मोठे ब्रह्मास्त्र असल्याचं रणबीर म्हणाला. “मला खूप आनंद झाला आहे, या मुलाचा/पुरुषाचा (अयान मुखर्जी) मला अभिमान आहे,” असं तो अयानला जवळ घेत म्हणाला. यावेळी रणबीरने अयानची या चित्रपटासाठी केलेली मेहनत आणि प्रेमाचा उल्लेख केला. आपल्या संपूर्ण आयुष्यात एखाद्या चित्रपटासाठी इतकी मेहनत घेताना मी कुणालाच पाहिलं नाहीये, असं रणबीर अयानचं कौतुक करत म्हणाला.

सायकल पंक्चर झाल्यानं रिक्षातून जावं लागलं घरी; या अभिनेत्याला ओळखलंत का?

 “धन्यवाद. तुमचं मनोरंजन होत आहे, तुम्ही सिनेमागृहात खूप छान वेळ घालवत आहात. चित्रपट काय आहे तर, प्रेक्षकांनी सिनेमागृहात परत येणं, मनोरंजन होणं, हसणं, टाळ्या वाजवणं, हाच आहे. सिनेमागृहात परत आल्याने मी आनंदी आहे,” असं प्रेक्षकांबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला. दरम्यान, अभिनेत्री आलिया भट्ट ब्रह्मास्त्रच्या स्क्रीनिंगमध्ये रणबीर कपूर आणि अयान मुखर्जीबरोबर दिसली नाही.

‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १२५ कोटींची तर वर्ल्ड वाइड २१० कोटींची कमाई केली आहे. रविवारी, दाक्षिणात्य भाषांमधील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने १६ कोटींची कमाई केली. यातील तेलुगु भाषेतील चित्रपटाने आत्तापर्यंत सर्वाधिक १३ कोटींचा गल्ला जमवला आहे. दाक्षिणात्य भाषांमधील ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे व्हर्जन सोमवारी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.