बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाला गेल्याच महिन्यात २१तारखेला कन्यारत्नाचा लाभ झाला होता. आयुष्यमानच्या या मुलीचे नाव वरुष्का असे ठेवण्यात आले आहे.
आपल्या या चिमुकलीचे नाव पत्नी ताहीराने ठेवल्याचे आयुष्यमान सांगितले आहे. अर्मेनियन भाषेमध्ये या नावाचा अर्थ गुलाब देणारी असा होतो. आयुष्यमानने प्रेयसी ताहिराशी विवाह केला होता. ती एक लेखिका आहे. या दाम्पत्याला २०१२ साली पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. सध्या आयुष्यमान बॉम्बे फेरीटेल आणि दम लगा के हायशा या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
आयुष्यमानच्या मुलीचे नाव ‘वरुष्का’
बॉलीवूड अभिनेता आयुष्यमान खुरानाला गेल्याच महिन्यात २१तारखेला कन्यारत्नाचा लाभ झाला होता.

First published on: 16-05-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurana names daughter varushka