अभिनेता आयुषमान खुराना या वर्षी त्याचा वैयक्तिक पंजाबी-हिंदी गाण्यांचा अल्बम घेऊन येत आहे. यश राज फिल्म म्युझिक कंपनी हा अल्बम बाजारात घेऊन येणार आहे. २८ वर्षीय आयुषमानने या आधी त्याच्या ‘विकी डोनर’ आणि ‘नौटंकी साला’ या चित्रपटात गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे. या अल्बमची गाणी त्याने स्वत: आणि रोचक कोहली याने लिहीली आहेत. शूजित सिरकरच्या ‘विकी डोनर’द्वारे आयुषमानने चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. ‘हमारा बजाज’साठी हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. सध्या आयुषमान सोनम कपूरबरोबर यश राजच्या एका अनाम चित्रपटासाठी काम करत आहे.