छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायमच चर्चेत असते. पण बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता यांच्या विशेष चर्चा रंगतात. मुनमुन ही बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस’ या शोची चाहती आहे. ती बिग बॉसच्या प्रत्येक एपीसोडवर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देताना दिसते. दरम्यान मुनमुनचे असेच एक ट्वीट सध्या चर्चेत आहे.

मुनमुनने या ट्वीटमध्ये सलमान खान आणि शोच्या निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस १४च्या नुकताच पार पडलेल्या विकेंडच्या वारमध्ये सलमानने राखी सावंतची बाजू घेतली आणि स्पर्धक अभिनव शुक्लाला अनेक प्रश्न विचारले. त्यामुळे मुनमुन दत्ताने नाराजी व्यक्त केली.

‘अभिनव आणि रुबीनाला आजच्या भागामध्ये ज्या प्रकारे वागणून देण्यात आली ती पाहून अतिशय वाईट वाटले. सर्वांना माहिती आहे की राखीमुळे अभिनवला किती त्रास होत आहे. पण तरी देखील राखीला कोणी फार काही बोलले नाही. मनोरंजन करणेच सर्वकाही नसते’ या आशयाचे ट्वीट मुनमुनने केले असून तिने सलमान खान आणि शोच्या निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.