‘बाहुबली २’ च्या दमदार एन्ट्रीमुळे सलमान खानसमोर एक नवं आव्हान उभे राहिले आहे. सलमान खानचा ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. मात्र, सध्या चित्रपटसृष्टीत बाहुबलीचे बळ दिसत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर यंदा सलमान खानला नवे आव्हान निर्माण झाले आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४१ कोटींची विक्रमी कमाई करुन सलमान खान आणि आमिर खान यांना पिछाडीवर टाकले. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६. ५४ कोटींची कमाई करत एक विक्रम केला होता. ‘बाहुबली २’ ने सलमानचा हा विक्रम मोडीत काढला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४१ कोटींची कमाई करुन सलमानसमोर एक नवे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे सलमान खानला बाहुबलीचे आव्हान पेलणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटातील सलमानचा आणखी एक लूक नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा टिझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडमधील सलमान, आमिर आणि शाहरुख यांच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा रंगते. यात बॉक्स ऑफिसवर कधी शाहरुख अव्वल स्थानी राहतो तर कधी आमिर सलमान यांच्या चित्रपटात शर्यत पाहायला मिळते. मात्र यंदाच्या वर्षी तिन्ही खानला बाहुबलीशी टक्कर द्यावी लागणार आहे. बाहुबलीला टक्कर देण्यासाठी सलमान चांगलाच तयारी लागला आहे. शनिवारी सलमान खानने आगामी चित्रपटाबाबत ट्विट केले. सलमानने लिहिले होते की, ‘मजा आयेगा..सिर्फ चार दिन बाकी’ असे सांगत  ‘ट्युबलाइट’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे ट्विट त्याने केले. कबिर खान दिग्दर्शित सलमानचा ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत सोहेल खान आणि चीनी अभिनेत्री झू झू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटासंदर्भात आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीर म्हणाला की, या चित्रपटात सलमान खान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ‘बजरंगी भाईजान’ मधील भूमिकेपेक्षा आगामी चित्रपटातील त्याच्या भूमिकेला पाच पट अधिक पसंती मिळेल.