कलर्स वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभल’ या मालिकेला प्रेक्षांची पसंती मिळतेय. या मालिकेमुळे संत बाळूमामांचा महिमा महाराष्ट्रात पसरला आहे. महाराष्ट्रातचं नव्हे देशात अनेक ठिकाणी बाळूमामांचे भक्त आहेत. तर अनेकांचं श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांचे चमत्कार ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतून पाहायला मिळत आहे. या दोन्ही मालिकेत संताची भूमिका साकारणारे अभिनेता सुमित पुसावळे आणि अक्षय मुडावदकर यांनी त्यांच्या भूमिकांविषयी लोकसत्ता डिजिटल अड्डावर मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीच्या निमित्ताने संताची भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार एकत्र आले. एका संताची भूमिका साकारताना त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी शेअर केले आहेत.
संत बाळूमामांची भूमिका साकारताना जबाबदारीचं खूप मोठं असल्याची भावना अभिनेता सुमित पुसावळेने व्यक्त केली आहे. तर लहानपणाबासून त्या स्वामींची घरात पूजा केली त्यांच स्वामींची भूमिका साकारायची संधी मिळाली तेव्हा अक्षयची नेमकी प्रतिक्रिया कशी होती हे त्याने लोकसत्ता डिजिटल अड्डावर सांगितलं आहे.