२०२३ हे वर्षं मनोरंजनविश्वासाठी फारच रंजक होतं. गेले काही दिवस दाक्षिणात्य चित्रपट आणि हॉलिवूडचे चित्रपट भारतात जबरदस्त चालत होते, परंतु २०२३ हे वर्षं बॉलिवूडसाठी फार महत्त्वाचं ठरलं. असं असलं तरी ‘ओपनहायमर’ ‘बार्बी’ आणि नुकताच आलेला ‘अॅक्वामॅन’सारखे हॉलिवूडचे चित्रपटही भारतात चांगलेच गाजले. सध्या आपण ज्याप्रमाणे सरत्या वर्षातील चांगल्या आणि फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांची उजळणी तशीच उजळणी अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही केली आहे.

बराक ओबामा यांनी नुकतीच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर यावर्षीच्या त्यांना सर्वात आवडलेल्या अन् गाजलेल्या चित्रपटांची यादी शेअर केली आहे. अमेरिकेतील लेखक आणि कलाकार यांचा संप मध्यंतरी चांगलाच चर्चेत होता. यावेळी मनोरंजन विश्वाचे आणि व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले. तरी अमेरिकेत अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट बनवले गेले याची दखल ओबामांनी घेतली आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ चांदेकरच्या नवीन वर्षातील दुसऱ्या चित्रपटाची घोषणा; ‘या’ अभिनेत्रीसह करणार रोमान्स

आपल्या ट्वीटमध्ये ओबामा लिहितात, “यावर्षीच्या सुरुवातीलाच लेखक आणि कलाकार काम करण्यास उत्तम वातावरण व सुरक्षेसाठी संपावर होते. यातून निर्माण झालेले बदल या मनोरंजनसृष्टीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.” त्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडत्या चित्रपटांची यादीही शेअर केली. यापैकी ‘रस्टीन’, ‘लीव द वर्ल्ड बिहाइंड’ आणि ‘ अमेरिकन सिम्फनी’ या तीन चित्रपटांची नावं ओबामा यांनी सर्वप्रथम घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच इतर काही आवडलेल्या कलाकृतींमध्ये त्यांनी नोलनच्या ‘ओपनहायमर’चा समावेश केला. याबरोबरच ‘पास्ट लाईव्ह्स’, ‘ब्लॅकबेरी’, ‘अमेरिकन फीक्शन’यासारख्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावंही ओबामा यांनी त्यांच्या या यादीत सामील केली होती. परंतु याबरोबरच ओबामा यांनी ‘बार्बी’ व मार्टिन स्कॉर्सेसेचा ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या दोन्ही चित्रपटांकडू सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप बऱ्याच लोकांनी त्यांच्या या पोस्टखाली केला आहे.