१९९८ मध्ये गायिका बेला शेंडे यांनी ‘सा रे ग म’ या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्या विजेत्या झाल्या होता. त्यावेळचा अनुभव बेला शेंडे यांनी लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादामध्ये सांगितला आहे. “सा रे ग म मधील प्रवासाविषयी सांगण्यासारखं बरच काही आहे. सा रे ग म म्हणजे एक शाळा होती. तेथून बाहेर पडताना आम्ही खूप काही शिकून बाहेर पडलो होतो. पहिल्यांदा मी सा रे ग म मध्ये १९९४-९५मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर १९९८ मध्ये मी सा रे ग म जिंकले” असे बेला शेंडा म्हणाल्या.
सा रे ग म या शोमध्ये अनेक दिग्गज गायक परिक्षक म्हणून असायचे. आताच्या स्पर्धेपेक्षा फार वेगळी स्पर्धा त्यावेळी पाहायला मिळायची. तेव्हाचा ‘सा रे ग म’मधील पूर्ण प्रवास बेला शेंडे यांनी सांगितला आहे.