बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे हे फोटो पाहून अनेकजण त्याला ट्रोल करत आहे. तर काहींनी त्याला समर्थन करताना दिसत आहे. रणवीर सिंगच्या या फोटोंवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री मिमी चक्रवर्ती या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन काही ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी प्रश्नही उपस्थित केले आहेत.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली “आपल्या देशात…”

या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, “रणवीर सिंगने नुकतंच केलेल्या न्यूड फोटोशूटची सर्वात जास्त चर्चा आहे. ते फोटो इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक लोक त्याच्या या फोटोंबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. पण मी विचार करतेय की जर रणवीर एखादी महिला असती तरीही तिची अशाप्रकारे स्तुती केली गेली असती का? की तुम्ही त्यांची घर जाळून टाकली असती, मोर्चे काढले असते आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असती किंवा मग त्यांना लाज वाटेल असे काही केले असते.”

“आपण नेहमी समानतेबद्दल बोलतो. पण आता ती कुठे आहे? तुमची वृत्ती एकतर काहीतरी बदलू शकते किंवा ती पूर्णपणे नष्ट करू शकते हे तुम्हाला माहीत आहे. या विषयावर आपण आपला दृष्टीकोन सर्वसमावेशक करणे गरजेचे आहे. कारण आपले शरीर मिळवण्यासाठी आपल्याला फार त्याग करावा लागतो. मीठ, साखर किंवा कार्ब्सने ते येत नाही”, असे मिमी चक्रवर्ती यांनी म्हटले.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर दीपिका पदुकोणची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी…”

दरम्यान रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली “आवडत्या सहकलाकाराबद्दल…”

रणवीरच्या या लूकवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. रणवीरने बर्ट रेनॉल्डच्या सन्मानार्थ पेपर मासिकासाठी हे फोटोशूट केलं आहे. डाएट सब्या नावाच्या एका अधिकृत इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.