सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सुरुवातीला राघिनीचा मित्र रवीशंकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीदरम्यान त्याने राघिनीचं नाव घेतलं. त्यामुळे आता तिला देखील अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण काय आहे?

सेंट्रल क्राईम ब्रांचने बंगळुरमधील एका ड्रग्स रॅकेटच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या ठिकाणी त्यांना एक डायरी सापडली. या डायरीमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील १५ सेलिब्रिटींची नावं आहेत. यापैकी एक नाव प्रसिद्ध अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिचं देखील आहे. परिणामी क्राईम ब्रांचने तिला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. शुक्रवारी सकाळी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु चौकशीसाठी ती गैरहजर राहिली. शिवाय तिने सोमवारपर्यंत वेळ देखील मागितला होता. दरम्यान क्राईम ब्रांचने तिचा मित्र रविशंकर याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने रागिनीचं नाव घेतलं. त्यानंतर पोलिसांनी राघिनीचा घरी छापा टाकला व तिला अटक केली. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणात चौकशी सुरु आहे. तसंच या प्रकरणाचे सुत्रधार विदेशात असल्याचा संशय त्यांना आहे. या ड्रग्स गँगमध्ये रागिनीची भूमिका काय आहे? याचा तपास आता केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी काय म्हणाली होती राघिनी?

“बुधवारी मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तशी मला नोटिस देखील मिळाली होती. पण इतक्या कमी वेळेत चौकशीसाठी पोहोचणं मला शक्य नव्हतं. मी कायद्याचा आदर करते. आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करेन.” अशा आशयाचं ट्विट करुन रागिनीने पोलिसांची माफी मागितली होती.