भालचंद्र कदम म्हणजे सर्वांचा लाडका भाऊ आणि कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दोघांच्याही विनोदाचा अचूक टायमिंग तर कमालीचा आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे तर ही जोडी सुपरहिट ठरली. फक्त पडद्यावरच नव्हे तर पडद्यामागे देखील कुशल-भाऊचं नातं अगदी घट्ट आहे. ‘पांडू’ चित्रपटातही या दोघांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बरीच धमाल-मस्ती कुशल-भाऊने केली. बऱ्याच महिन्यांनंतर चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ कुशलने शेअर केला आहे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचं सुखी कुटुंब, पत्नी-मुलासोबतचे सुंदर फोटो

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?

सोनाली कुलकर्णी, भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेल्या ‘पांडू’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या चित्रपटामधील गाणी तर प्रचंड गाजली. या चित्रपटामध्ये कुशल देखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिळालेल्या वेळेमध्ये कुशल-भाऊने चक्क गाणं गायलं. कुशलने हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी यासाठी पसंती दर्शवली आहे.

पाहा व्हिडीओ

कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दोघंही ‘मैंने पूछा चाँद से’ हे गाणं गाताना दिसत आहेत. शिवाय रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये बसून दोघं थंड वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहेत. कुशलने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “पांडू चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा एक व्हिडीओ सापडला. खूप थंडी होती आणि आमचा सीन यायला बराच वेळ होता, तेव्हा मस्त शेकोटी पेटवून मी आणि भाऊ गाणी गात बसलो होतो. आमच्या दोघांचीच मैफल. आठवणी कायम मनात घर करून राहतात.”

आणखी वाचा – “काय झाडी, काय डोंगार, काय प्राजक्ता…”; प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची चर्चा, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट

दोघांच्या या गाण्याच्या मैफिलीला काही जणांनी कमेंटच्या माध्यमातून पसंती दर्शवली आहे. ‘पांडू’ या चित्रपटामध्ये कुशल-भाऊने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही या दोघांनी धमाल करत प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. कुशल-भाऊच्या सुपरहिट जोडीला सिनेरसिक देखील भरभरुन प्रेम देतात.