भोजपुरी सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता पवन सिंह तुम्हाला माहित आहे का? असा प्रश्न विचारला असता तुम्हाला पटकन आठवणार नाही. पण ‘लॉलीपॉप लागेलु’ या गाण्याचं नाव घेतलं की लगेच ते गाणंही आठवतं. ‘लॉलीपॉप लागेलु’ हे गाणं पवन सिंह यानेच गायले आहे. पवन स्वतः गायक आणि अभिनेता आहे. अगदी कमी वेळातच ‘लॉलीपॉप लागेलु’ हे गाणं व्हायरल झालं होतं. अन्य भाषिक लोकांनाही हे गाणं प्रचंड आवडलं. अनेकांच्या आवडत्या गाण्यांमध्ये हे गाणे आवर्जुन असते. तसं पाहिलं गेलं तर हे गाणं काही नवीन नाही. पण इतक्या वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ तसुभरही कमी झालेली नाही.

पवन सिंह या गाण्यामुळे घराघरात पोहोचला. सध्या पवनचा हे गाणं गातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पवन लंडनच्या रस्त्यावर उभं राहून गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ गेल्यावर्षीचा असून पवन सिंहसोबत निरहुआ दिनेशन लाल यादव आणि अक्षरा सिंह दिसत आहे. हा व्हिडिओ लंडनच्या चाहत्यांसोबतचा आहे. ज्यांनी भर रस्त्यान पवन सिंह यांना ‘लॉलीपॉप लागेलु’ हे गाणं गायलं लावलं होतं. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखोहूनही अधिक लोकांनी पाहिला आहे. पवन सिंह ऑफिशीयल या यू-ट्युब अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी ५ नोव्हेंबरला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी पवन सिंहने अभिनेत्री अक्षरा सिंहला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. एका चित्रीकरणासाठी हे दोघं सिलवासा हॉटेलच्या एका रूममध्ये होते. मीडिया रिपोर्टनुसार, पवनने हॉटेल कर्मचाऱ्यांसमोरच अक्षराला मारहाण केली. त्याने अक्षराचे केस पकडले आणि तिचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं होतं.

या मारहाणीत अक्षराच्या हाताला दुखापत झाली आहे. पवनने इतके जास्त मद्यपान केले होते की, हॉटेलचे कर्मचारी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असताना तो शांत न होता अधिक संतप्त झाला. पवन सिंह प्रसिद्ध गायक तर आहेच शिवाय तो एक अभिनेताही आहे. त्याने अनेक भोजपूरी सिनेमांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने अरेंज मँरेज केले. पण अक्षरा आणि त्याच्या नात्याबद्दलही अनेकदा बोलले गेले आहे. लग्नाआधी पवन अनेक कार्यक्रमांमध्ये अक्षराची ओळख ‘तुमची वहिनी’ अशीच करुन द्यायचा.