scorecardresearch

Premium

भर लाइव्ह इव्हेंटमध्ये गोळीबार, प्रसिद्ध गायिकेला गाणं गात असताना गोळी लागली अन्…; नेमकं काय घडलं?

लाइव्ह इव्हेंटमध्ये गोळी लागून प्रसिद्ध गायिका जखमी, नेमकं काय घडलं?

nisha-upadhya-bullet-injury
लाइव्ह इव्हेंटमध्ये गोळी लागून प्रसिद्ध गायिका जखमी. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिला लाइव्ह इव्हेंट दरम्यान झालेल्या गोळीबारात गोळी लागली आहे. बिहारमधील सारण येथे इव्हेंटमध्ये गाणं गात असतानाच निशाला गोळी लागली आहे. गोळी लागल्यानंतर निशाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी(३० मे) लाइव्ह इव्हेंट दरम्यान काही लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात गाणं गात असलेल्या निशाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेत निशाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर पटना येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा>> “मानवशिवाय ‘पवित्र रिश्ता’ अपूर्ण आहे”, ‘त्या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचं नाव…”

बिहारमधील या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु, या घटनेबाबत कोणतीही तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. गोळीबार कशाप्रकारे करणयात आला आणि तो कोणी केला? याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा>> “ओंकार भोजने ग्रेट आहे”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारमधील सारण या गावात एका सांस्कृतिक कार्यक्रमात निशा गाणं गाण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडली. निशा ही भोजपुरीमधील प्रसिद्ध गायिका असून ती लोकगीतांसाठी ती ओळखली जाते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 19:19 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×