Sidharth Shukla Death: चाहत्यांकडून सिद्धार्थ शुक्लाच्या जुन्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ शुक्लाला ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती.

SidharthShukla
(Photo-Instagram@sidharthshukla)

वयाच्या ४०व्या वर्षीच अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा निरोप घेतला आहे. हृदय विकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचं निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयानं दिली आहे. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीनंतर मालिका विश्वासह देशाभरातील त्याच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जातोय.

सिद्धार्थच्या निधनानंतर त्याचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. यातच आता सिद्धार्थ शुक्लाच्या एका जुन्या ऑडिशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थचा मोठा चाहता वर्ग होता. या चाहत्यांनी सिद्धार्थचा हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हे देखील वाचा: आधी दोन वेळा सिद्धार्थ शुक्लाने दिला होता मृत्यूला चकवा पण यावेळी…, काय घडलं होतं नेमकं?

या व्हिडओत सिद्धार्थ नेहमीप्रमाणेच हॅण्डसम दिसतोय. त्याने टी-शर्ट आणि जॅकेट परिधान केलंय. या ऑडिशनमध्ये सिद्धार्थ त्याच्या खास स्टाइलमध्ये डायलॉग बोलताना दिसतोय. सिद्धार्थच्या या ऑडिशन व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळतेय. या व्हिडीओत सिद्धार्थचा अभिनय पाहून अनेकांनी त्याचं कौतुकही केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@badshah_of_my_world)

हे देखील वाचा: फिटनेसफ्रीक, हॅण्डसम अन्… अशी होती ‘बिग बॉस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची लाइफस्टाइल

सिद्धार्थ शुक्लाला ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमुळे मोठी लोकप्रियता मिळाली होती. तसचं २०१४ सालामध्ये आलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाया’ सिनेमात तो आलिया भट्टसोबत झळकला होता. तसचं सिद्धार्थने २०१९ साला मधील ‘सूरमा’ चित्रपटात अभिनेता दिलजीत दोसांझ सोबत काम केलं आहे. त्यासोबतच ‘बिग बॉस १३’चं विजेतेपद पटकावतं त्याने लाखो चाहत्यांची मनं जिंकली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Big boss fame sidharth shukla death old audition video goes viral kpw

ताज्या बातम्या