मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नेहा पेंडसे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रियकर शार्दुल सिंह बयास याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. पुढच्या वर्षी हा विवाहसोहळा पार पडणार असून महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नाच्या विधी पार पडणार आहेत. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नेहाने लग्नाची तारीख जाहीर केली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नेहा लग्नगाठ बांधणार आहे. ५ जानेवारी २०२० रोजी नेहा व शार्दुल आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. पुण्यात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. नेहाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवशी शार्दुलने तिला कार भेट म्हणून दिली.

https://www.instagram.com/p/B1IjVt5DevL/

आणखी वाचा : महेश कोठारेंच्या सुनेनं केला मेकओव्हर; बघून अभिनेत्रीही झाल्या अवाक्

नेहाने सोशल मीडियावर शार्दुलसोबतचे फोटो पोस्ट केले होते. त्यातीलच एका फोटोमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत असल्याने नेटकऱ्यांनी तिचा साखरपुडा झाल्याचा अंदाज बांधला होता. या चर्चांनंतर नेहाने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहाने १९९५ साली ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तिने मराठीसोबतच तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं. ‘दिवाने’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘देवदास’ या हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली. ‘मे आय कम इन मॅडम’ आणि ‘बिग बॉस १२’ या कार्यक्रमांमुळे ती प्रकाशझोतात आली.