छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विकेंड का वारमध्ये या वेळी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसणार आहेत. तर हे सेलिब्रिटी आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी इथे येणार आहेत. यावेळी नेहा भसीन ही अभिजीत बिचुकलेवर संतापल्याचं दिसतं आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा प्रोमो कलर्स टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यात सुरुवातीला इतर काही सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्या स्पर्धकाला त्याच्या चुका सांगतात आणि आता काय केले पाहिजे ते सांगतात. तर दुसरीकडे नेहा ही अभिजीतवर संतापते. नेहाने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री म्हणून प्रवेश केला होता. तर अभिजीतला रिअॅलिटी चेक देत नेहा बोलते की पैर की जूती बोलेंगे ना, जूते से मारूंगी आपको अंदर आकर.’ यावर उत्तर देत अभिजीत रागात बोलतो, ‘मेरी भाभी है ना, टकली करेगी तुझको.’

आणखी वाचा : सुपरस्टार होण्यापूर्वी राजेश खन्ना यांच्या घरी AC ठिक करायला गेला होता ‘हा’ अभिनेता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर उत्तर देत संतापलेली नेहा बोलते अभिजीत, तुझ्या तोंडी लागण्याची काही गरज नाही. तर अभिजीतचं हे वक्तव्यं ऐकल्यानंतर सलमानसोबत इतर सगळ्या लोकांना धक्का बसतो. या आधी शनिवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये सलमान अभिजीत आणि करण कुंद्राला खूप काही बोलतो. त्यानंतर करणला खूप वाईट वाटते.