या आठवड्यात बिग बॉस १५ च्या घरात सातत्यानं भांडणं पाहायला मिळाली. एकमेकांचे शत्रू असलेले सदस्य मित्र झाले. तर चांगले मित्र असलेले सदस्यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खान सर्वच सदस्यांवर भडकलेला पाहायला मिळाला. विशेषतः राखी सावंतचा पती राकेशवर तो खूप जास्त भडकलेला पाहायला मिळाला. तसेच सलमाननं राखीच्या पतीला तिच्याशी चांगलं वर्तन करण्याची सूचनाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या आठवड्याभरात राकेश सातत्यानं राखीवर चिडताना, ओरडताना दिसला. मागच्या आठवड्यात फराह खाननं देखील राकेशला समजावलं होतं की त्यानं राखीसोबत अशाप्रकारे वागू नये. पण त्याच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही. एवढंच नाही तर तो ‘राखी माझ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.’ असं म्हणताना दिसला. तिच्यावर ओरडताना तसेच हुकूम गाजवताना दिसला. नॅशलन टेलिव्हिजनवर राकेशनं राखीसोबत जसं वर्तन केलं ते पाहून सलमान खान त्याच्यावर भयंकर चिडलेला पाहायला मिळाला.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खान राखी सावंतच्या पतीला ओरडताना दिसत आहे. तो राकेशला म्हणाला, ‘मोठे- मोठे लोकही आपल्या पत्नीशी अशा शब्दात बोलत नाहीत जसं तू राखीसोबत बोलतोस. तुला शिस्त आहे की नाही? तू आहेस कोण? कोण ओळखत होतं तुला? राखीमुळे तुला आता संपूर्ण देश ओळखत आहे. तू राखीसोबत अशाप्रकारे बेशिस्तपणे वागणं चालू ठेवलंस तर ते तुझ्यासाठी नुकसानकारक ठरेल.’

याशिवाय सलमान खाननं राखी सावंतलाही हे सर्व सहन न करण्याचा सल्ला दिला. त्यावर राखी म्हणाली, ‘मी हे सर्व यासाठी सहन करत आहे. कारण मला भीती वाटते की राकेश मला कायमचं सोडून जाईल.’ राखीच्या बोलण्यावर सलमान म्हणाला, ‘मग ठीक आहे. जाऊ दे त्याला.’ दरम्यान संपूर्ण शोमध्ये राखी सावंत आणि राकेश यांच्या नात्यात दुरावा आल्याचं स्पष्ट दिसत आहे. मागच्या एका एपिसोडमध्ये राखी सावंत याबाबत तेजस्विनी प्रकाशसोबत बोलतानाही दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 15 salman khan get angry on rakhi sawant husband rakesh mrj
First published on: 18-12-2021 at 13:31 IST