‘बिग बॉस १९’मध्ये दिसणारी अशनूर कौर ही बाल कलाकार आहे. वयाच्या ५ व्या वर्षी करिअरला सुरुवात करणाऱ्या अशनूरने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये छोटी नायराची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली.

बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी अशनूर कौरने एका मुलाखतीत तिच्या किशोरावस्थेतील दिवसांबद्दल सांगितले. अशनूरने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तासनतास काम करण्याबद्दल देखील सांगितले. तिने सांगितले की वयाच्या ६ व्या वर्षी तिने सलग ३० तास काम केले आणि ती बेशुद्ध पडली.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अशनूर कौरने सांगितले की, ती तीन दिवसांपासून भुकेली होती आणि कोणालाही काहीच कळले नाही, त्यामुळे ती सेटवर बेशुद्ध पडली. अशनूरने सांगितले की, आता ती फक्त १२ तास काम करते, पण जेव्हा तिने तिच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे इतके पर्याय नव्हते की ती स्वतःचे निर्णय घेऊ शकेल.

अशनूर कौर काय म्हणाली?

अशनूर कौर म्हणाली, ‘मी सतत ३० तास शूटिंग केले आहे. त्यावेळी मी ६ वर्षांची होते आणि ‘शोभा सोमनाथ की’ नावाचा एक शो करत होते. मी इतकी थकले होते की मला कोणतेही काम करता येत नव्हते. माझ्या आईने मला व्हॅनिटीमध्ये काही तास झोपायला सांगितले. मी जेव्हा झोपले होते, तेव्हा प्रॉडक्शनचे लोक बाहेर वाट पाहत होते आणि मग मी पुन्हा कामाला सुरुवात केली.’

अशनूरने असेही सांगितले की, नंतर तिला तिच्या शरीरयष्टीबद्दल अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. ती खूप जागरूक झाली आणि म्हणूनच तिने अनेक दिवस कोणालाही न सांगता फक्त पाणी पिण्यास सुरुवात केली. तिने काहीही खाल्ले नाही, यामुळे अशनूर एकदा सेटवर बेशुद्ध झाली. तिने तीन दिवसांपासून भूक लागल्याचे कोणालाही सांगितले नव्हते.

अश्नूर कौरने ‘सुमन इंदोरी’, ‘झांसी की रानी’, ‘साथ निभाना साथिया’, ‘पटियाला बेब्स’, ‘ना बोले तुम ना मैने कुछ कहा’ आणि ‘दिया और बाती हम’ असे अनेक टीव्ही शो केले आहेत.