लोककलेची पिढीजात परंपरा यशस्वीरित्या सांभाळणारे आजचे आघाडीचे, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदे येणार आहेत. उत्कर्ष शिंदे हा बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आला. उत्कर्ष शिंदे हा नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सध्या उत्कर्ष हा कामानिमित्ताने मारापूर गावात शूटींग करत आहे. नुकतंच त्याने या गावात शूटींग करतानाचा अनुभव सांगितला आहे.

उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच उत्कर्षने काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडलं, अशा आशयाखाली एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Love Jihad
व्हायरल होत असलेला लव्ह जिहादचा तो व्हिडीओ…

उत्कर्ष शिंदेची इन्स्टाग्राम पोस्ट

“माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडल.”

शूटिंग साठी आम्ही मंगळवेढे माझ्या गावा नजीक मारापूर येथे शूट करत होतो.संध्याकाळ झाली,सूर्य प्रकाश मंदावला होता .आऊटडोर म्हंटलं कि चाहते आलेच सर्वाना भेटून सर्व सांभाळत शूट सुरु होत आणि त्यातच पाऊस धो धो पडू लागला .कॅमेरा ,ड्रोन ,गिम्बल पावसात कसबस सांभाळत पॅक अप केलं .परत रिसॉर्ट वर पोहोचलो आणि सर्वाना ओढ लागली मुंबई परतीची .सर्वजण बॅगपॅक करतच होतो कि कानी आवाज पडला “सर कॆमेराची लेन्सकिट कुठे सापडत नाहीये.सर्वांची शोधा शोध सुरु झाली.2 लाखाच्या लेंस ची किट कोणालाच सापडत न्हवता.

9:30 झाले.अंधारात परत लोकेशन च्या ठिकाणी जाऊन काही टॉर्च मारत तर काहीनि गाड्या ब्यागा 4-4वेळेस झटकून पाहिल्या. केमेरा,प्रॉडक्शंन,अससिस्टन्ट टिम ,ते स्पॉट बॉय तर रडायलाच लागले .लेंस कुठेच सापडेना. मग अखेरीस मी शकलं लढवली दोघांना घेऊन लोकेशन कडे निघालो.खेडंगाव असल्या मुळे क्वचित घरं आणि जी गर्दी शूट बघायला आली होती ती त्याच घरांन पैकी असावी असा अंदाज लावला. म्हंटलं हा परियाय वापरून बघावा. मग एका घराकडे पोहोचलो. माझ्या टिम मधील दोघे त्या घरा कडे जाऊन विचारपूस करू लागले गेले.

“तुमच्या पैकी कोणी त्या तिथे शूटिंग सुरु असताना होते का किंवा कोणाला काही वस्तू सापडल्या का ?असे विचारतच होते.कि एक शेतकरी मुलगा चिखलातून वाट काढत समोर आला आणि म्हणाला “तुम्ही शूटिंग वाले का ?”. मी झाडाखाली थांबून शूटिंग बघत होतो तिथे उत्कर्ष शिंदेंना पाहिलं. साहेब तुमची एक वस्तू तिकडेच विसरली वाटतं. ती मी माझ्या कडे जपून ठेवली आहे. माझा एक मित्र उत्कर्ष शिंदेंचे फोटो रोज स्टेट्सला ठेवत असतो मी त्याला संपर्क केला. काही संपर्क सापडतोय का बघायला म्हणजे तुमची वस्तू पोहोचवता आली असती. आता तुम्हीच आलात तर तुमची वस्तू घेऊन जावा.

शिंदें साहेबानची भेट होईल का? मी त्यांचा चाहता आहे अस म्हणताच,माझी टिम तडक त्याला माझ्या कडे घेऊन आलली .घडलेला प्रकार मला सविस्तर सांगितलं.मी त्याला त्याचे नाव विचारले ,म्हणाला सोमनाथ नराळे मी हि मग गळा भेट घेत, त्याचा कौतुक केलं जाता जाता त्याच्या सोबत फोटो हि काढले. लाखोंची केमेरा लेंस परत सापडली म्हणून माझी टिम आनंदाने नाचत होती .तर तो बिचारा मला भेटला म्हणून किती खुश झाला.आणि मी मात्र सुनं झालो,विचारात पडलो. ह्या दोघांन पैकी कोणाचा आनंद मोठा ?. टिमचा कि मला भेटला म्हणून त्या शेतकऱ्याचा ?इमानदारी ,निखळ प्रेम ,थोर संस्कार.काल त्या गरीब शेतकरी मुलात मी सर्वात श्रीमंत व्यक्ती पाहिला .माणसात देव असतो ऐकलं होत काल देवाच दर्शन घडल., असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान भगवान शिंदे यांच्या सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील संगीत क्षेत्राची सेवा केली. प्रल्हाद शिंदे यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्याने भक्तीगीतं, भीमगीतं तसेच लोकगीते आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांचा संगीताचा हाच वारसा आनंद शिंदे आणि त्यांची नातवंडे पुढे चालवताना दिसत आहेत. आनंद शिंदे यांनी गायलेली गाणी केवळ मराठी सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही पाय थिरकायला लावणारी आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनी देखील संगीत क्षेत्रात उंचच उंच भरारी घेतली आहे. आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे उत्कृष्ट पेटीवादक होते. तर त्यांची आजी सोनाबाई या तबलावादक होत्या.