महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्या त्यांच्या गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच अमृता फडणवीस यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात हजेरी लावली. यावेळी त्या बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. याचे प्रोमोही सध्या व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दिवसांपासूनच बिग बॉसच्या घरात वाद, भांडण आणि गॉसिप्सला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांना राज्यातील राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “भक्तीत तल्लीन व्हा…” दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना घरातील कॅप्टनपदावरुन काही प्रश्न विचारले. ‘बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाला फार महत्त्व आहे. ते खूप महत्वाचे असते. पण बिग बॉसच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, त्याचा कॅप्टन कोण?’ असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येणार अमृता फडणवीस, पाऊल ठेवताच म्हणाल्या, “मी आले असते तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर अमृता फडणवीसांनी फारच मिश्किलपणे उत्तर दिले. “मी तुम्हाला दोन नाव सांगते, सध्या ते महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत. यातील एक व्यक्ती प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन आहे. या कॅप्टनपैकी पहिले नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले कॅप्टन आहेत. दुसरे कॅप्टन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यांचे हे उत्तर ऐकून बिग बॉसच्या घरातील सर्वांनीच टाळ्या वाजवल्या. तसेच त्यांच्या या उत्तराचे कौतुकही केले.