गेल्या एका दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. हिंदीत सुरू झालेला हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की काहीच वर्षात अनेक प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.बिग बॉसचा नवा सीझन कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. तशीच बिग बॉस तेलुगूचे चाहते खूप दिवसांपासून बिग बॉस तेलुगूच्या नव्या सीझनची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. पाच सीझन सुपरहिट ठरल्यानंतर बिग बॉस तेलुगूचा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच बिग बॉस तेलुगूच्या सहाव्या सीझनचा प्रोमो रिलीज झाला. हा प्रोमो पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या आनंदाचं कारण असं की तीन सीझन होस्त केल्यानंतर हा शो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार नागार्जुन होस्ट करणार आहेत. ही बातमी खुद्द नागार्जुन यांनी दिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, 'तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार ! हे सगळं लिहीत असताना त्यांनी एक हार्ट इमोजी देखील दिला आहे. नागार्जुन यांच्या या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत या नव्या सीझनबद्दल उत्सुकता दर्शवत आहेत. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही हा प्रोमो शेअर करत बिग बॉस या सुपरहिट शोचा नवीन सीझन लवकरच येणार आहे असे सांगितले आहे. बिग बॉस नॉन-स्टॉपचा फायनलिस्ट शिवा देखील यात सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. बिग बॉस तेलुगूचा हा सहावा सीझन ४ सप्टेंबरपासून लाइव्ह स्ट्रीमिंग होईल अशा चर्चा रंगल्या आहेत. परंतु निर्मात्यांनी अद्याप ही तारीख जाहीर केलेली नाही. “आम्ही लवकरच…” सुझान खानशी लग्न करण्याबद्दलच्या चर्चांवर अर्सलन गोणीचा मोठा खुलासा या शोसोबतच नागार्जुन लवकरच 'द घोस्ट' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात नागार्जुनसोबत सोनल चौहानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आगामी काळात नागार्जुन यांना वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.