गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे सोनू निगम. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे. आज ३० जुलै रोजी सोनू निगमचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फरिदाबाद येथे जन्म झालेल्या सोनूला लहानपणापासूनच गायनाचा वारसा लाभला होता. सोनूचे वडिलदेखील लहान-मोठ्या समारंभामध्ये गाणं गात असत. त्याचाच परिणाम सोनूवर झाला आणि त्याच्यात गायनाची आवड निर्माण झाली. यातून रोज गायनाचा सराव करत सोनूने त्याच्या वडिलांबरोबर गाण्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तो देखील वडिलांची साथ देत लग्नसमारंभात गाणी गाऊ लागला. सोनूने त्याचं पहिलं गाणं वयाच्या चौथ्या वर्षी एका लग्नात गायलं आणि तिथूनच त्याच्या गायनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

वडिलांबरोबर गाणी म्हणणाऱ्या सोनूने एका लग्नाला मोहम्मद रफी यांचे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं गाऊन त्याच्या गायनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचं हे गाणं उपस्थित असणाऱ्या साऱ्यांच्याच पसंतीत पडलं होतं. लोकांचा प्रतिसाद पाहून सोनूने गायक व्हायचं स्वप्न पाहिलं आणि येथून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.

गायक व्हायचं स्वप्न उराशी बाळगून सोनूने वयाच्या १९ व्या वर्षी मुंबई गाठली आणि संघर्ष करत आज गायनक्षेत्रात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सोनूने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांतील गाणी गायली आहेत. त्याची जवळपास सगळीच गाणी हिट ठरली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday specail know about sonu nigam first song avb
First published on: 30-07-2021 at 08:30 IST