MS Dhoni’s record of three consecutive sixes : आयपीएल २०२४ मधील २९वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. धोनीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची शेवटच्या षटकात ज्या प्रकारे धुलाई केली, त्याचा आनंद सीएसकेच्या चाहत्यांनी वानखेडेवर घेतला. या सामन्यात धोनीला फलंदाजी करताना फक्त ४ चेंडू खेळायला मिळाले. ज्यावर धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने २० धावा केल्या.

धोनीच्या नावावर एका विशेष विक्रमाची झाली नोंद –

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या षटकात धोनी फलंदाजीला आला. डॅरिल मिशेलची विकेट पडताच धोनी फलंदाजीसाठी मैदानात पोहोचला. धोनीने येताच पहिल्याच चेंडूपासून आपली जादू दाखवायला सुरुवात केली. धोनीने हार्दिकला लागोपाठ तीन षटकार ठोकले. यासह आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला. आयपीएलमध्ये पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारणारा धोनी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: रोहितची शतकी खेळी व्यर्थ; पथिरानाच्या गोलंदाजीमुळे चेन्नईचा मुंबईवर दणदणीत विजय
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

धोनीने वयाच्या ४२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार फलंदाजही आयपीएलमध्ये आजपर्यंत अशी कामगिरी करू शकलेले नाहीत. त्याचबरोबर एमएस धोनीने आयपीएलमध्ये सीएसकेसाठी ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी ५००० धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरल आहे. याआधी सुरेश रैनाने सीएसकेसाठी हा पराक्रम केला आहे. तसेच एमएस धोनी टी-२० फॉरमॅटमध्ये संघासाठी २५० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी, विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे, ज्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून २५८ टी-२० सामने खेळले आहेत.

हेही वाचा – VIDEO : पंजाब किंग्जचा विजय प्रीती झिंटाला पडला होता महागात, संघासाठी बनवावे लागले होते १२० आलू पराठे

प्रथम फलंदाजी सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकात ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावली. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे केवळ पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी रचिन रवींद्रलाही २१ धावा करता आल्या. यानंतर दुबे आणि गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी झाली, जी हार्दिक पांड्याने मोडली. या सामन्यात ऋतुराजने ४० चेंडूंचा सामना करत ६९ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि पाच षटकार आले. मुंबईकडून हार्दिक पंड्याने दोन तर गेराल्ड आणि गोपालने प्रत्येकी एक विकेट घेतली.