बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्य आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही काळापूर्वीच त्यांनी ‘सच कहूं तो’ हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल बरेच धक्कादायक खुलासे केले आहे. ज्यात त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाचाही उल्लेख आहे. एका निर्मात्यानं त्यांच्याकडे चित्रपटाच्या बदल्यात शरीरसंबंधांची मागणी केली होती असं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

आपल्या पुस्तकात कास्टिंग काऊचबद्दल बिनधास्त व्यक्त होणाऱ्या नीना गुप्ता यांना मात्र कास्टिंग काऊच किंवा शरीरसंबंधांची मागणी ही जबरदस्ती किंवा असहाय्यता वाटत नाही तर ही आपली वैयक्तीक निवड आहे असं वाटतं. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या जुन्या मुलाखतीत त्यांनी कास्टिंग काऊचवर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “मी माझ्या पुस्तकातून आगामी काळात या क्षेत्रात येणाऱ्या तरुणाईला संदेश दिला आहे. बॉलिवूड असो वा इतर कोणतंही क्षेत्र. कोणतीही व्यक्ती शरीरसंबंधांसाठी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. तुम्हाला काय करायचं आहे हा तुमचा निर्णय असतो.”

या विषयावर बोलताना नीना पुढे म्हणाल्या होत्या, “तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवायचेत की नाही किंवा किती तडजोड करायची हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. जर तुम्ही असं करणार नसाल तर आणखी १० मुली असं करण्यासाठी तयार असतात. त्यावेळी तुमच्याही मनात लालच निर्माण होतं की, असं केलं तर मला ही भूमिका मिळेल. पण तुम्ही असं केल्यानंतरही तुम्हाला एखादी भूमिका मिळेल की नाही याची काहीच खात्री नसते. चित्रपट तयार करणं हा एक व्यवसाय आहे आणि तो बिघडावा अशी कोणाचीही इच्छा नसते. कोणसोबत शरीरसंबंध ठेवून आपला बिझनेस खराब करावा असं कोणालाही वाटत नाही.”

आणखी वाचा- “अन् रिहर्सल करताना माझी पँट…” बॉबी देओलनं सांगितला २५ वर्षांपूर्वीचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्वतःला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलंय, “एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यानं मला हॉटेलच्या रुमवर भेटायला बोलवलं होतं. त्यावेळी त्याने चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात माझ्याकडे त्याच्यासोबत एक रात्र घालण्याची मागणी केली होती. मात्र हे सगळं अमान्य करत मी तिथून निघून आले.”