काही चित्रपटांच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करणारी ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, यावेळी ते दोघंही चर्चेत येण्याचं कारण कोणता चित्रपट नसून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आहेत. हल्ली सोशल मीडियावर पोस्ट केलेली कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यासाठी अवघे काही सेकंदही पुरेसे असतात. त्यातही ठराविक सोशल मीडिया अकाऊंट्सवर अनेकांच्याच नजरा असतात. त्यामुळे कोणतीही पोस्ट करताना नेहमीच काळजी घेणं योग्य असतं. पण, तीच काळजी काहीजण घेत नाहीत आणि मग सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या ट्विट्समुळे चर्चेत असतात. त्यातच भर म्हणजे त्यांनी पुन्हा एक ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलंय. एक व्हायरल पोस्ट करत त्यांनी ट्विट केलं. त्यानंतर लगेचच अभिनेत्री जुही चावलानेसुद्धा चिंटूजींचं हे ट्विट रिट्वीट केलं. पण, बी- टाऊन कलाकारांची ही टिवटिव नेटिझन्सनी मनावर घेतली आणि त्यावर खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ऋषी कपूर यांनी पोस्ट केलेल्या या ट्विटमध्ये एक कोडं आहे. ज्यामध्ये वय आणि जन्मवर्षाची बेरीज केल्यास २०१७ हे उत्तर मिळेल. हा योग १००० वर्षांतून एकदाच येतो असंही या पोस्टमध्ये म्हटलं गेलंय.

ऋषीजींच्या या ट्विटवर आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत जुहीने हे ट्विट रिट्विट केलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बऱ्याच पोस्टपैकी एक असणाऱ्या या पोस्टवर सध्या नेटीझन्सनी या कलाकारांच्या बुध्यांकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून कलाकारांची फिरकी घेण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor rishi kapoor and actress juhi chawlas mathematical blunder on twitter viral post people questioning their iq
First published on: 18-07-2017 at 18:22 IST