बॉलीवूड चित्रपटांमध्ये सध्या नवनवीन प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता लवकरच एक नवीन हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं ‘मुंज्या’ असं नाव आहे. मराठमोळ्या आदित्य सरपोतदारने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. नुकताच या हॉरर चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘मुंज्या’ चित्रपटाच्या एकूण २.१८ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सगळेच कलाकार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. मुंज्या आणि मुन्नीमध्ये नेमकं काय कनेक्शन आहे? मुन्नीच्या प्रेमात वेडा झालेल्या मुंज्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा कशी अपूर्ण राहते. लग्नाआधी झालेला मृत्यू, शापित झाड या सगळ्याची झलक प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, या सगळ्यात आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती गोष्ट म्हणजे चित्रपटात झळकणारे मराठी कलाकार…’मुंज्या’मध्ये एक दोन नव्हे तर मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : २७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर माधुरी दीक्षित अन् कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर ‘मुंज्या’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये तिची झलक पाहायला मिळत आहे. आजवर विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिकाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता ती बॉलीवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या हास्यजत्रेचे कलाकार तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : Cannes मध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा ‘देसी’ लूक; रेड कार्पेटवर अभिनेत्रीच्या नथीने वेधलं लक्ष

रसिका वेंगुर्लेकरशिवाय मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर, बालकलाकार खुशी हजारे, शर्वरी वाघ असे बरेच मराठी कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

हेही वाचा : “जनावरांसारखं वागवलं जातं”, ‘पंचायत’ फेम अभिनेत्रीने मांडली इंडस्ट्रीतील व्यथा; म्हणाली, “कलाकारांना छोट्याशा घाणेरड्या खोलीत…”

हेही वाचा : Video: वडिलांच्या निधनामुळे घेतला ब्रेक, आता दमदार कमबॅकसाठी गश्मीर महाजनी सज्ज, पाहा नव्या शोचा जबरदस्त टीझर

दरम्यान, ‘मुंज्या’ चित्रपटाचं दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने केलं असून या सिनेमात मोना सिंह, अभय वर्मा यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘स्त्री’ चित्रपटाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून ‘मुंज्या’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या ७ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक आगळी-वेगळी कलाकृती रुपेरी पडद्यावर येणार म्हणून सध्या प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.