अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी त्यांच्या रिलेशनशीपसाठी नेहमीच चर्चेत असतात. सध्या दोघं त्यांच्या आगामी चित्रपट ‘शेरशाह’चं प्रमोशन करताना दिसत आहेत. अश्यात त्या दोघांचा एक इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यातील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून सिद्धार्थ आणि कियारा त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. ‘शेरशाह’ हा चित्रपट येत्या १२ ऑगस्ट रोजी अॅमेझोन प्राइम वर रिलीज होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या इन्स्टावर सक्रिय असून त्याच्या कामाबद्दलची माहिती नेटकऱ्यांना देतं असतो. नुकताच त्याने त्याचा आणि कियाराचा बनवलेला एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यातील त्या दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते या रीलवर फिदा झालेले दिसून येत आहे. या रीलमध्ये सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’मधील ‘रांजा’ हे गाणं रिक्रीयेट केलं आहे. यात ते एकमेकांकडे पाहून हसत आहेत आणि त्यांची जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षक या रीलच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे.
सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. यात कियाराने ब्लाउज आणि लाँग स्कर्ट परिधान केला असून त्याला मॅचिंग कानातले देखील घातले आहेत. तसंच सिद्धार्थने निळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट परिधान केल्याचे दिसून आले आहे. सिद्धार्थच्या कमेंट सेक्शनमध्ये त्या दोघांच्या या लुकचं कौतुक होताना दिसत आहे.
View this post on Instagram
‘शेरशाह’या चित्रपटात सिद्धार्थ कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणार आहे. तसंच या चित्रपटात त्यांची प्रेयसी डिंपल चीमा यांची भूमिका कियारा अडवाणी साकारताना दिसेल. शौर्य, प्रेम आणि त्यागाची ही कथा १२ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.