आयकर विभागाच्या चौकशीनंतर अभिनेता सोनू सूदने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या फाउंडेशनमधील प्रत्येक रुपया एक अनमोल जीव वाचवण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी असल्याचं तो म्हणालाय. तर नुकत्याच एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सोनूने आपण कायद्याचं उल्लघन केलं नसल्याचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आयकर विभागाने चार दिवस चौकशी केली असून त्यांच्या सर्व प्रश्नांचं दिली असल्याचं सोनू म्हणाला.

तर फॉरेन फंडिगमधऊन आलेला प्रत्येक रुपया थेट रुग्णालयांमध्ये पोहचला असल्याचं त्याने स्पष्ट केलं. या छाप्यांच्या मागे राजकिय उद्देश वाटतो का? या प्रश्नावर सोनू म्हणाला, “मी अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहचलेलो नाही. मी सध्या शैक्षणिक गोष्टींवर काम करतोय. त्यामुळे मला कोणत्याही राज्यातून बोलावलं गेलं तर मी सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे. याचा अर्थ मी अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाशी जोडलो गेलोय किंवा कोणत्याही पक्षाशी जोडलो गेलोय असा होत नाही. ” पुढे सोनू म्हणाला “मी कोणत्याही राज्यासाठी आणि पक्षासाठी मदत करण्यास तयार आहे. या चौकशीचा माझ्या कामावर फरक पडणार नसून मी माझं काम सुरु ठेवेन”

याच मुलाखातीच सोनूने दोन वेळा राज्यसभेच्या ऑफर नाकारल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मी अद्याप या गोष्टीसाठी तयार नाही. जेव्हा मी स्वत:ला तयार करेन तेव्हा स्वत: सगळ्यांसमोर ही गोष्ट जाहीर करेन.” असं म्हणत सोनूने त्याला कोणत्या पक्षातून ऑफर मिळाली होती हे सांगणं मात्र टाळलं.

आयकर विभागाच्या चौकशीत आवश्यक ती सर्व कागदपत्र आणि माहिती पुरवू असं तो म्हणाला. आतापर्यंतच्या चौकशीत सोनू सूदने आयकर विभागाला सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. मदतीसाठी सोनूला आलेले सर्व मेल पाहून आयकर विभागदेखील थक्क झाल्याचं तो म्हणाला आहे.