एखादा खास कार्यक्रम असेल तरच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि इतर बॉलिवूड कलाकार एकत्र येताना दिसतात. तसेच कोणत्याही कार्यक्रमात सर्व कलाकार एकत्र एकाच मंचावर दिसणे म्हणजे चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. नुकताच बॉलवूडमधील सर्व कालाकारांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये केवळ बॉलिवूड कलाकारच दिसत नसून देशाती सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक कुटुंब देखील दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये बच्चन कुटुंब, अंबानी कुटुंब, अभिनेत्री दीपिका पदूकोण, गौरी खान आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार दिसत आहेत.
हा फोटो बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यानचा आहे. डिझायनरने २०१२मधील हा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री अमृता सिंह, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आणि दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री कंगना रणौत, अभिनेता फरहान अख्तर, अभिनेत्री जूही चावला, ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, अभिनेत्री सिमी गरेवाल, अभिनेत्री सुजेन खान उपस्थित असल्याचे दिसत आहे.
डिझायनरने हा फोटो शेअर करत ‘या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात अंबानी परिवाराचा सहभाग आणि पाठींबा आमच्यासाठी मोलाचा आहे. आम्ही त्यांना या पुस्तकाची नकली प्रत दाखवली होती आणि ती वाचून त्यांनी आम्हाला पाठींबा दिला. या पुस्तकाची भारतातील लॉन्च पार्टीदेखील त्यांनी त्यांच्या घरी आयोजित केली. मी त्यांचे आभार मानतो’ असे कॅप्शन दिले आहे.