अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या नात्याविषयी आता कोणतीही गोष्ट लपून राहिलेली नाही. विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावणारं हे मोस्ट हॅपनिंग कपल सध्या एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत आहे. ‘विरुष्का’ आपआपल्या कामांत व्यग्र असूनही वेळ मिळेल तेव्हा एकमेकांची भेट घेतात. मुख्य म्हणजे आनंदाच्या क्षणांसोबतच कठीण प्रसंगांनाही हे कपल एकत्र सामोरं जातं. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावरचे त्यांचे फोटो पाहताना येतोय. आयपीएलच्या १०व्या हंगामात विराटच्या नेतृत्त्वाखाली बंगळुरूच्या संघाला काही आपलं स्थान कायम राखता आलं नाही. आयपीएलमध्ये वाट्याला येणारं सततचं अपयश पाहता बऱ्याचजणांनी विराटच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. पण, अनुष्का मात्र त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.
विराटच्या संघाच्या वाट्याला अपयश आल्यावर सर्व परिस्थिती पाहता अनुष्का थेट बंगळुरुला रवाना झाली. तिच्या येण्यानं विराटच्या मनावर असणारं दडपण काहीसं कमी झालं असणार यात शंका नाही कारण, या दोघांनाही एका रेस्तराँमध्ये एकत्र पाहण्यात आलं. यावेळी विराट बऱ्यापैकी चिंतामुक्त दिसत होता.
वाचा: ‘तू तिथे मी’…! ‘विरुष्का’चं सेलिब्रेशन संपता संपेना
विराटची भेट घेतल्यानंतर अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला. मुख्य म्हणजे या फोटोमध्ये तिने विराटची टोपी घातली आहे. ही विराटचीच टोपी आहे कारण, त्याआधीचे फोटो पाहिल्यावर ही गोष्ट लक्षात येतेय, की हीच टोपी विराटनेही घातली होती. विराट-अनुष्काच्या या खास डेटवर ते दोघंही कॅज्युअल लूकमध्ये दिसत होते. यावेळी विरुष्काच्या चाहत्यांनीही त्यांचे फोटो काढले. सध्याच्या घडीला या बहुचर्चित जोडीकडेच सर्वांच्या नजरा आहेत. त्यांच्या नात्याविषयी सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी, ज्यावेळी विरुष्काच्या नात्यात गैरसमजुतींचं वादळ आलं होतं त्यावेळी अनुष्कालाच अनेकांनी दोष दिला होता. पण, विराटने मोठ्या धाडसाने जाहीरपणे तिची पाठराखण केली होती.