बॉलिवूडची ड्रामा क्विन अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणून राखी सावंतला ओळखले जाते. सध्या राखी आणि तिचा पती रितेश हे दोघेही बिग बॉसमुळे चर्चेत आहे. नुकतंच राखीच्या पतीचे आधीच एक लग्न झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याला एक मुलगाही असल्याचे फोटो व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु झाल्या आहे. राखी सावंतच्या पती रितेश पहिल्या लग्नाचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर आता बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. नुकतंच अभिनेत्री कश्मिरा शाह हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कश्मिरा शाह हिने राखी सावंतच्या पती रितेश पहिल्या लग्नाचे व्हायरल होणारे फोटो पाहिले. यावर ट्वीटरवर प्रतिक्रिया देत ती म्हणाली, “अरे देवा, मला आताच कोणीतरी फोटो पाठवला आहे. ज्यामध्ये राखी सावंतचा कथित पती रितेशने आधीच दुसऱ्या महिलेशी लग्न केले आहे. म्हणजे तो राखीसोबत खोटं बोलला? जर त्याने राखीची फसवणूक केली असेल, तर त्याला बाहेर येताच प्रथम माझा सामना करावा लागेल. त्यामुळे ही बातमी खोटी असावी, अशी मी आशा करते.”

इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरात रितेशने ज्याप्रकारे राखी सावंतसोबत भांडण करतोय ते पाहूनही कश्मिरा संतापली. “बिग बॉसच्या घरातील रितेशचे वागणे मला जराही आवडले नाही. त्यामुळे कोणीतरी रितेशला सांगा की राखी सावंतशी चांगले बोलायला? त्याने राखीशी असे बोलणे मला अजिबात आवडत नाही. त्याला कानाखाली मारून घराबाहेर हाकलून द्यावंसं वाटतं. राखी मूर्ख नाही. फक्त मुलांबद्दल तिची निवड जरा वाईट आहे,” असेही ती म्हणाली.

हेही वाचा : “मला तुझा कंटाळा आलाय”, नवऱ्याचे ‘ते’ शब्द ऐकताच राखी सावंतचं जोरदार भांडण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बिग बॉसच्या १५ व्या पर्वात ‘तिकीट टू फिनाले’ हा खेळ रंगला. या खेळात सर्वच स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी राखी ही तिचा पती रितेशला हा खेळ नेमका काय आहे, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. त्यादरम्यानच राखी आणि रितेशमध्ये जोरदार भांडण झाले.