अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. राधिका तिच्या भूमिकांमुळे चर्चेत असतेच. पण त्याचबरोबरीने राधिकाचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. काही वर्षांपूर्वी राधिकाने लंडनमध्ये स्थायिक असलेला संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये राधिकाचा विवाहसोहळा संपन्न झाला. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल राधिकाने स्वतःच्याच लग्नात फोटो काढले नाहीत. याबाबत तिने स्वतःच खुलासा केला आहे.

आणखी वाचा – पायल रोहतगी अडकली विवाहबंधनात, शाही विवाहसोहळ्यात नो मेकअप लूकने वेधलं साऱ्यांचं लक्ष

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने आपल्या लग्नाबाबत काही गोष्टी सांगितल्या. यावेळी ती म्हणाली, “१० वर्षांपूर्वी बेनेडिक्ट आणि माझं लग्न झालं. पण लग्नामध्ये आम्ही फोटो काढायलाच विसरलो. आम्ही आमच्या जवळच्या मित्र-मंडळींना लग्नासाठी आमंत्रित केलं. स्वतःचं जेवण बनवलं. इंग्लंडमधील एका ठिकाणी आम्ही लग्न केलं. तिथेच पार्टी केली. इतकं सगळं झालं पण आम्ही फोटो काही काढले नाही. आमचे काही मित्र तर उत्तम छायाचित्रकार होते. तरीही त्यांनी आमचे फोटो काढले नाहीत.”

पुढे बोलताना ती म्हणाली, “आम्ही फोटो काढले नाहीत कारण माझ्या नवऱ्यासह आम्ही सगळेच तेव्हा नशेमध्ये होतो. म्हणून माझ्या लग्नाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण हे एका अर्थी चांगलं देखील आहे. माझ्या नवऱ्याला खरं तर फोटो काढण्यामध्ये रसच नाही. आता त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा झाली आहे. आम्ही फिरायला जातो तेव्हा फोटोसाठी तो पोझ देतो.”

आणखी वाचा – Photos : परी म्हणू की सुंदरा…; प्राजक्ता माळीच्या नव्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण राधिकाने स्वतःच्याच लग्नात फोटो काढले नाहीत हे ऐकून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. २०१२मध्ये राधिकाने बेनेडिक्टबरोबर लग्न केलं. तिच्या लग्नाची कुठेच फारशी चर्चा झाली नाही. नृत्य प्रशिक्षणासाठी राधिका जेव्हा लंडन येथे गेली तेव्हा या दोघांची ओळख झाली. आज राधिका-बेनेडिक्ट सुखाचा संसार करत आहेत.