जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. गेल्या दोन दशकातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडमधूनही या हल्ल्याचा निषेध होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहे. पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २० हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. विकी कौशल, आमिर खान, अक्षय कुमार, सलमान प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, स्वरा भास्कर यासांरख्या कलाकारांनी पुढे येत शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. या भ्याड हल्ल्याचा कलाकारांनी निषेध केला आहे.

पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्यानं मी पूर्णपणे हादरले आहे. द्वेष हे उत्तर असूच शकत नाही असं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं ट्विट करून म्हटलं आहे.

तर अभिनेता विकी कौशलनंही शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामा दशवादी हल्ल्याची बातमी वाचून मला खूप मोठा धक्का बसला आहे. या हल्ल्यात जे जवान जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो असं विकी म्हणाला. विकीनं ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक्स ‘ या चित्रपटात सैन्यातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

तर अभिनेता अजय देवगन यानं या भ्याड हल्ल्याचा ट्विटरवर निषेध केला आहे.

अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, दिग्दर्शक करण जोहर यांनी देखील शहीदांना श्रद्धांजली वाहत जखमी जवानांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २, ५४७ जवानांना ७० वाहानांतून नेले जात होते यावेळी सीआरपीएफचा ताफा अवंतीपुराला पोहोचताच आत्मघातकी वाहनं ताफ्याला धडकले. या हल्ल्यात ७६ व्या बटालियन वाहानाच्या चिंधड्या उडाल्या आणि अन्य वाहानांचीही मोठी हानी झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood celebrities on kashmir pulwama terror attack
First published on: 15-02-2019 at 10:31 IST