रेडिओ शोपासून सुरु झालेला विनोदाचा प्रवास आज त्याला इतकी प्रसद्धी देऊन जाईल अशी अनेकांनी आशाही केली नव्हती. पण, त्याने स्वत:च्या बळावर हे यश मिळवलं. विनोदवीर म्हणून नावारुपास आलेला हा कलाकार म्हणजे अभिनेता सुनील ग्रोवर. ‘गुत्थी’, ‘डॉ. मशहूर गुलाटी’, ‘रिंकू भाभी’ या पात्रांना व्यासपीठावर जिवंत करणाऱ्या आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सुनील ग्रोवरचा खरा चेहरा कसा असेल, हा कलाकार खऱ्या आयुष्यात नेमका कसा दिसत असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. सहसा विविध पात्र साकारण्यासाठी चेहऱ्यावर मेकअप लावलेल्या सुनीलचा खरा चेहरा नुकताच अनेकांच्या नजरेस पडला आहे. मुंबई विमानतळावर या विनोदवीराचा खरा लूक सर्वांसमोर आला.
नेहमी अतरंगी अवतारामध्ये दिसणाऱ्या सुनीलला पाहून सर्वप्रथम काहीजणांचा विश्वासच बसला नाही. कारण यावेळी तो सर्वसाधारण प्रवाशासारखाच दिसत होता. राखाडी रंगाची पँट, सफेट टी- शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट अशी त्याची स्टाईल स्टेटमेंट यावेळी पाहायला मिळाली. सुनील ग्रोवर या कलाक्षेत्रात बऱ्याच वेळापासून कार्यरत होता. पण, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमातून त्याचा चेहरा खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला. त्या कार्यक्रमात सुनीलने साकारलेली ‘गुत्थी’ अनेकांच्या मनात घर करुन राहिली. त्यानंतर कपिलचा कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ या नावाने एका दुसऱ्या विहिनीवर सुरु झाला. त्यावेळी त्यातही सुनील ‘डॉ. मशहूर गुलाटी’ आणि ‘रिंकू भाभी’ या भूमिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला होता.
बघता बघता त्याच्या चाहत्यांचा आकडाही वाढू लागला. किंबहुना कपिलच्या कार्यक्रमाला असणाऱ्या तगड्या टीआरपी रेटिंगचं श्रेय अनेकांनी सुनीललाही देऊ केलं. सर्वकाही सुरळीत सुरु असताना कपिल शर्मासोबत झालेल्या वादामुळे सुनीलने त्याची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याची ही एक्झिट अनेकांसाठी अनपेक्षित होती. ज्याचा परिणाम कपिल शर्मा शोच्या टीआरपी रेटिंगवरही झाला. सध्यातरी सुनील स्टेज शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण, येत्या काळात टेलिव्हिजन विश्वात धम्माल विनोदी शैलीसह तो पुनरागमन करेल अशी अनेकंना आशा आहे.
वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…