अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. मात्र NCBच्या चौकशीवर अभिनेता कमाल आर. खान याने नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या बॉलिवूड कलाकारांना वाचवण्यासाठी NCB प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.
अवश्य पाहा – “चाप ओढला अन् कान सुन्न झाले”; ‘मिर्झापूर २’साठी अभिनेत्रीने केली खरीखुरी ‘शुटिंग’
कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने NCBवर निशाणा साधला आहे. “बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांना वाचवण्यासाठी एनसीबीने आपली चौकशी थांबवली आहे. हे समाजासाठी खूप घातक आहे. शक्तीशाली लोक काहीही करु शकतात अन् कायद्यामार्फत त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा होणार नाही, असा समज लोकांमध्ये निर्माण झाला आहे. अशा आशयाचं ट्विट करुन त्याने NCBवर जोरदार टीका केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – Video: पिक्चरसाठी कायपण! अभिनेत्याने धावत्या बुलेट ट्रेनवरुन केला खतरनाक स्टंट
#NCB has stopped drugs investigation to save big Bollywood stars and its a very bad example for the society. Now public will feel and think that powerful people can do anything and law can’t punish them.
— KRK (@kamaalrkhan) October 7, 2020
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.