रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या बहुचर्चित कपलच्या नात्यात दुरावा आला असला तरीही कामाच्या निमित्ताने समोरच्या व्यक्तीला दिलेला शब्द त्यांनी चांगलाच पाळला आहे. अनेकांची दाद मिळवणारी ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रपटातून रणबीर, कतरिना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. त्यात आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे.

‘युटीव्ही मोशन पिक्चर्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या किंवा चित्रपटाच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे प्रेक्षकांना पूर्वसूचना देण्यात येतात अगदी त्याच प्रकारच्या पूर्वसूचना रणबीर आणि कतरिना देत आहेत. यात रणबीर त्याच्या अनोख्या शैलीत घोषणा करत असून कतरिना त्याच्या या घोषणांवर अभिनय करुन दाखवताना दिसते.

Hardik Pandya : अंतिम सामन्यातील हार्दिकच्या परफॉर्मन्समुळे लिशा शर्मा आली चर्चेत, पाहा कोण आहे ‘ती’?

हा व्हिडिओ पाहता ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातच नाही तर, प्रमोशनल व्हिडिओमध्येही रणबीर- कॅटची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळते. ‘देखिये जग्गा जासूस.. जो आपके होश उडा देगी.. अपनी फॅमिली के साथ जरुर देखिये’ असं म्हणत रणबीर या व्हिडिओतून प्रेक्षकांना मोठ्या आपुलकीने चित्रपट पाहण्यासाठी बोलवत आहे. पण, त्याचं हे बोलवणं कोणा दुसऱ्याच व्यक्तीकडे इशारा करतेय. ‘अपनी फॅमिली के साथ देखिये’ असं म्हणताना रणबीर- कॅटचं नातं आणि स्क्रीनवरची अवघी काही सेकंद बरंच काही सांगून जात आहे. दरम्यान, ‘जग्गा जासूस’चं हटके कथानक पाहता सध्या या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचं वातारण पाहायला मिळत आहे. ‘डिस्ने’ आणि ‘पिक्चर शुरु प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेला ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट १४ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.