‘बादशाहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अजय देवगण आणि इलियाना डिक्रूझ ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी ‘रेड’ या चित्रपटातून हे दोघं पुन्हा स्क्रीन शेअर करत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर अजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रेड’च्या निमित्ताने अजय पुन्हा एकदा लक्षवेधी भूमिकेत दिसत असून यावेळी तो अजय पटनायइक या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय.
‘पॅनोरमा स्टुडिओज’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून १९८१चा काळ साकारण्यात आला आहे. लखनऊमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांची मुजोरी आणि काही करबुडव्यांची उदाहरणं घेत या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे. १९८१ मध्ये आयकर विभागाकडून देशातील सर्वात मोठी धाड कशा प्रकारे टाकण्यात आली होती, यावर ‘रेड’मधून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
Heroes Don't Always Come In Uniform.
Here's the #RaidTrailer :https://t.co/6ANAdANK9T@rajkumar_rkg @Ileana_Official
In cinemas on 16th March.— Ajay Devgn (@ajaydevgn) February 6, 2018
VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा
१६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘रेड’च्या निमित्ताने चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार या साऱ्यांच्याच अनुभव पणाला लागला आहे हे खरं. अजय देवगणचा अभिनय आणि त्याचे संवादकौशल्य पाहून हा ट्रेलर सध्या बराच चर्चेत आला आहे. त्यामुळे येत्या काळात ‘रेड’च्या संवादांची चर्चा होणार हे नाकारता येत नाही. अभिनेते सौरभ शुक्ला या चित्रपटातून नकारात्मक भूमिकेत झळकणार असून, अजय साकारत असलेल्या पात्रापुढे अडथळ्यांचा डोंगर उभा करणार आहेत. तेव्हा आता या अडचणींवर मात करत ही ‘रेड’ बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.