हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता शाहरूख खानला विविध विशेषणांनी संबोधण्यात येतं. त्यातीलच एक विशेषण म्हणजे ‘किंग ऑफ रोमान्स’. रुपेरी पडद्यावर गेल्या बऱ्याच वर्षांपासून शाहरुख त्याच्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकतो आहे. आजवर त्याने साकारलेल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे हे जरी खरं असलं तरीही त्याच्या रोमॅण्टिक भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. असा हा ‘किंग ऑफ रोमान्स’ पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘ले जाये जाने कहा हवाए हवाए’, असे बोल असणाऱ्या या गाण्याने सध्या सोशल मीडियावर आणि चित्रपट वर्तुळात धुमाकूळ घातला आहे.

इर्शाद कामिलच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केलं असून, अरिजित सिंगने ते गायलं आहे. एका वेगळ्याच दुनियेत नेणारा अरिजितचा आवाज आणि स्क्रीनवर शाहरुख, अनुष्काची केमिस्ट्री या गाण्याला ‘चार चाँद’ लावत आहेत. मुख्य म्हणजे हे गाणं पाहताना शाहरुखने आतापर्यंत साकारलेल्या ‘राहुल’, ‘राज’ या बऱ्याच भूमिकांची आठवण होतेय.

वाचा : .. म्हणून शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना एकही पैसा मिळणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबी मुंडा ‘हॅरी’ आणि गुजराती मुलगी ‘सेजल’ यांच्यात उडणारे खटके आपण पाहिलेच होते. साध्या अंगठीवरुन होणारे त्यांचे वाद आणि त्यातच डोकावणारी सेजलची वकिली पाहिल्यानंतर आता इम्तियाज अली या दोघांच्या जोडीचा ‘परफेक्ट ब्लेंड’ असणारं हे गाणं सर्वांच्या भेटीला घेऊन आला आहे. या गाण्यातून काही सुरेख ठिकाणंही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनातील जमेची बाजूही इथे पाहायला मिळतेय, असं म्हणायला हरकत नाही.