करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं दिसत नाही. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, आता ही वस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर येताना दिसते. सगळ्याच क्षेत्रांसोबत कलाविश्वातील कामकाजदेखील सुरळीत होत आहे. अनेक चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्येच अभिनेत्री सनी लिओनी तिच्या आगामी प्रोजेक्टकडे वळली आहे. या सेटवरचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांमध्ये तिचा नवीन मास्क चर्चेचा विषय ठरत आहे.
करोना काळातदेखील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फॅशनसेन्स आणि मास्कच्या नवीन ट्रेण्डमुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कपड्यांना मॅच होणारे खास मास्क तयार करुन घेते. परंतु, या सगळ्यात सनी लिओनीचा मास्क आकर्षणाचा विषय ठरत आहे. मेकअप खराब होऊ नये याची खबरदारी म्हणून सनीने खास नवीन मास्क तयार करुन घेतल्याचं दिसून येत आहे.
सनीने तिच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पारदर्शक मास्क लावल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पारदर्शक मास्कमध्ये तिचं नाक, तोंड सगळं कव्हर होत असून तिने केलेला मेकअपदेखील नीट दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत सनीने तिल्या कॅप्शनदेखील तसंच दिलं आहे.
मेकअप खराब न करता चित्रीकरणादरम्यान मिळालेल्या वेळात सुरक्षित, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सनी तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत गेली होती. मात्र, आता ती परत मुंबईत परतली असून आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकडे वळली आहे.