बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या ‘12th fail’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. आता नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत विक्रांतने त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने ७ फेब्रुवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आपण बाबा झाल्याची गोड बातमी विक्रांतने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला मुलगा झाला असल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये विक्रांत व शीतल या दोघांनी मिळून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये विक्रांतने लिहिलं की, “आता आम्हीदेखील एक कुटुंब आहोत, आम्हा दोघांच्या विश्वात आम्ही आमच्या मुलाचे स्वागत करत आहोत अन् ही बातमी कळवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. तुमचेच शीतल व विक्रांत.”

आणखी वाचा : रणबीर कपूर साकारणार त्याच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका; भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बद्दल मोठी अपडेट

विक्रांतची ही पोस्ट पाहून बऱ्याच लोकांनी कॉमेंट करत अभिनंदन केले आहे, तसेच चित्रपटसृष्टीतीलही बऱ्याच सेलिब्रिटीजनी विक्रांत व शीतलचे अभिनंदन केले आहे. २४ सप्टेंबर २०२३ रोजी शीतल गरोदर असल्याचं विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. शीतलबरोबर काही वर्षे डेट केल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये विक्रांतने शीतलबरोबर लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांचा संसार अगदी आनंददायी व सुखाचा सुरू आहे.

विक्रांत मेस्सीने त्याच्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकेपासून केली होती. नंतर तो हळूहळू चित्रपटांतही छोट्या छोट्या भूमिका करू लागला. ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजमुळे विक्रांतला खरी ओळख मिळाली. यातील विक्रांतच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं. ‘12th fail’या चित्रपटासाठी ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला होता. ‘12th fail’ चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. विक्रांत आता लवकरच एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th fail actor vikrant massey and wife sheetal thakur became parents welcomes baby boy avn
First published on: 08-02-2024 at 09:08 IST