मराठमोळ्या छाया कदम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. छाया यांनी यंदा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. आईची साडी नेसून व नथ घालून त्या रेड कार्पेटवर अवतरल्या. इतकंच नाही तर त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला ‘कान’मध्ये पुरस्कार मिळाला. ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘कान’मध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला आहे.

छाया कदम यांच्या चित्रपटाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या चित्रपटाला स्क्रीनिंगनंतर स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आणि चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही खूप कौतुक होतंय. छाया कदम यांनी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’सा जाण्यापूर्वी लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासापासून ते हिंदीत छाप पाडणाऱ्या भूमिका मिळण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचं वर्णन केलंय.

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Divya Agarwal deleted wedding photos
प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?
sanjay leela bhansali vaibhavi marchant
‘ती’च्याशी अफेअरची चर्चा अन् ६१ वर्षांचे संजय लीला भन्साळी अद्याप अविवाहित; एकदा म्हणालेले, “ज्यांचं लग्नाचं वय उलटून…”
Punerkar boy marriage biodata viral
Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
Chhaya kadam Dance at cannes
“घराच्या अंगणात असल्यासारखं नाचत होत्या”, Cannes मधील डान्सवर टिप्पणी करणाऱ्याला छाया कदम म्हणाल्या…

“मन भरून आलं…”, Cannes मध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची पहिली पोस्ट; म्हणाल्या…

छाया कदम यांनी लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना नागराज मंजुळेंबरोबर काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला. यावेळी मंजुळेंसारखा एक तरी मित्र आयुष्यात असावा, असं विधान छाया यांनी केलं. छाया कदम यांनी नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’, ‘फँड्री’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!

नागराज मंजुळेंबद्दल काय म्हणाल्या छाया कदम?

छाया कदम म्हणाल्या, “नागराज मंजुळेवर मी हक्काने ओरडते. लोकांना वाटेल की मी अती बोलतेय पण मी त्याच्यावर खूप दादागिरी करते. नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आपल्या आयुष्यात असायला हवा. कारण मला माणूस म्हणून घडवायला नागराजची खूप मदत झाली. नागराज म्हणजे आमचं एक कुटुंब आहे. आमचं ठरलंय की आयुष्यात पुढे काहीच घडलं नाही तर आम्ही सगळे एकत्र आमचं म्हातारपण घालवणार आहोत. गप्पा मारत, सिनेमे बघत वेळ घालवणार.”

पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची पोस्ट

“आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाटेला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टीवल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्र्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथ पर्यंत येऊन पोहचला आहे. माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहचली आहे. खूप समाधान – आनंद आणि मन भरून आले,” अशी पोस्ट छाया कदम यांनी चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर केली.