अभिनेता आमिर खानने बुधवारी आगामी चित्रपट ‘सलाम वेंकी’च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. रेवती दिग्दर्शित या चित्रपटात आमिरने कॅमिओ केला आहे. यावेळी आमिरने चित्रपटातील मुख्य कलाकार काजोल आणि विशाल यांची यांचं कौतुक केलं. तसेच तो पुढील एक वर्ष चित्रपटांपासून दूर राहणार आहे, याचाही पुनरुच्चार केला. काही दिवसांपूर्वीच त्याने चित्रपटांपासून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

स्क्रिनिंगच्या रेड कार्पेटवर बोलताना आमिर म्हणाला, “सध्या मी काहीही करत नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून मी सतत काम करत आहे, त्यामुळे मला आता माझ्या कुटुंबाबरोबर थोडा वेळ घालवायचा आहे. पाणी फाउंडेशनचं काम पण सुरू आहे. बाकी इतरही कामं आहेत. त्यामुळे वर्षभरानंतर मी पुन्हा अभिनयात येईन. सध्या तुम्ही मला या चित्रपटात छोट्या भूमिकेत पाहू शकता.”

आमिरने शेवटचं ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात काम केलं होतं. यावेळी बोलताना आमिरने काजोल आणि विशाल जेठवा या कलाकारांच्या कामाचं कौतुक केले. या चित्रपटाचा भाग झाल्याचा आनंद असल्याचे सांगून आमिर म्हणाला, “चित्रटातील प्रत्येक कलाकाराने काजोल आणि विशालने इतकेच चांगले काम केले आहे. या चित्रपटाचा भाग असल्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. रेवतीने मला ही संधी दिली याचा मला आनंद आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लाल सिंग चड्ढा चित्रपटानंतर आमिर खानने आपण किमान वर्षभरासाठी चित्रपटांपासून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. काही दिवसांपूर्वीच तो कुटुंबीयांसह परदेशात फिरायला गेला होता.