बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिषेक लवकरच सैयामी खेरबरोबर ‘घुमर’ या चित्रपटात क्रिकेट कोचच्या भूमिकेत झळकणार आहे. याच्या प्रमोशनमध्ये सध्या संपूर्ण टीम व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चनने जॉन अब्राहम चुकून अभिनय क्षेत्रात आला आहे असं वक्तव्य केलं आहे.

नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘द बॉम्बे जर्नी’ या यूट्यूबच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अभिषेक बच्चनला त्याच्याकडे असलेल्या गाड्यांबद्दल विचारण्यात आलं, शिवाय तो त्याच्या गाड्यांची काळजी कशी घेतो कोणत्या मेकॅनिककडे दाखवतो याबद्दल विचारलं असताना अभिषेकने जॉन अब्राहमचं नाव घेतलं. जॉनचं बाईक प्रेम आणि एकूणच या क्षेत्रातील त्याचं ज्ञान आणि अभ्यास पाहता तो मेकॅनिक व्हायला हवा होता असं अभिषेक मस्करीत म्हणाला.

आणखी वाचा : ‘डॉन ३’साठी रणवीरच्या निवडीवरून होणाऱ्या टिकेबद्दल फरहान अख्तरने केलं वक्तव्य; म्हणाला, “जेव्हा…”

अभिषेक म्हणतो, “माझा एक मित्र आहे ज्याचं नाव आहे जॉन अब्राहम. तो खरंतर उत्तम मेकॅनिक झाला असता, त्याच्या नशीबाने त्याला या अभिनय क्षेत्राकडे खेचून आणलं. जॉनला त्याच्या बाईकचे पार्ट वेगळे करून ती बाइक पुन्हा तयार करायला आवडते. याबद्दल त्याल जास्त माहिती आहे. मी या सगळ्याबद्दल त्याच्याकडून बरंच शिकलो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक आणि जॉन अब्राहम यांनी प्रथम ‘धूम’ चित्रपटात काम केलं. त्यावेळी जॉनने अभिषेकला स्पोर्ट्स बाईक चालवायला शिकवल्याचंही अभिषेकने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. तेव्हापासून या दोघांची मैत्री झाली, त्यानंतर दोघांनी एकत्र करण जोहरच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटातही काम केलं. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या ‘घुमर’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. आर बल्की यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.