गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांनी आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट यांच्यापाठोपाठ आता बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता हॉलिवूड सिरीजमध्ये झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून इशान खट्टर आहे.

इशान हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘धडक’, ‘अ सुटेबल बॉय’, ‘फोन भूत’, ‘खाली पिली’ यांसारख्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारत त्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. इशानही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. तर बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करता करता त्याला एका हॉलिवूड वेब सिरीजची ऑफर आली आहे.

आणखी वाचा : “तिची नेहमीच तक्रार असते…” वहिनी मीरा राजपूतबद्दल इशान खट्टरने केला मोठा खुलासा

नेटफ्लिक्सच्या आगामी ‘द परफेक्ट कपल’ या वेब सिरीजमध्ये तो महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तर या वेब सिरीजमध्ये तो हॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री निकोल किडमनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. इशानने ही आनंदाची बातमी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत दिली. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं, “नवीन सुरुवात.”

हेही वाचा : कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर यांचे धमाल रियुनियन, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याची ही पोस्ट पाहून त्याचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. आता या पोस्टवर कमेंट करत नेटकरी तसंच मनोरंजन सृष्टीतील इशानची खास मित्रमंडळी त्याचं अभिनंदन करत आहेत.