‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. बुधवारी १० मे रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. गौहर खान ही सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. पण त्याबरोबरच ती तिच्या फिटनेसकडेही लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. गौहरने १० दिवसात १० किलो वजन कमी केले आहे.

गौहर खान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. गौहर खानने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती तिचे ट्रान्सफॉर्मेशन दाखवताना दिसत आहे. यात ती नाईट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. ती खूपच बारीक झाल्याचे यात दिसत आहेत.
आणखी वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान झाली आई, पोस्ट करत म्हणाली “आम्हाला आनंदाचा खरा अर्थ…”

gauhar khan post
गौहर खान

हा व्हिडीओ पोस्ट करत ती म्हणाली, “मी प्रसूतीनंतर दहा दिवसात १० किलो वजन घटवले आहे. अजून ६ किलो वजन कमी करायचे आहे.” गौहर खानची ही इन्स्टाग्राम स्टोरी पाहिल्यानंतर अनेकांना तिने इतके वजन कसे घटवले, असा प्रश्न पडला आहे.

आणखी वाचा : “आता माझ्यात शक्ती उरलेली नाही” आई झाल्यानंतर गौहर खानच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “रात्रीचे १२ वाजले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार याने नुकतंच पहिल्या बाळाचे स्वागत केले. गौहर खानने ३९ व्या वर्षी बाळाला जन्म दिला. “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत, अशी पोस्ट त्यांनी केली होती.